कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून शिवसेनेला डावलून समित्यांच्या नियुक्त्या !
कोल्हापूर, ४ सप्टेंबर (वार्ता.) – कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीच्या प्रमुख निर्णयात शिवसेनेला डावलले जाते. संजय गांधी निराधार योजना, जिल्हा दक्षता समिती अशा जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय अध्यक्ष, सदस्य यांच्या नियुक्त्या पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून परस्पर करण्यात आल्या आहेत. यात शिवसेनेच्या कोणत्याही पदाधिकार्याला स्थान देण्यात आलेले नाही. ही गोष्ट शिवसैनिकांवर अन्याय करणारी आहे. तरी यापुढील काळात प्रमुख समित्यांवर शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते यांची नियुक्ती करूनच समित्यांचे गठन करण्याच्या सूचना द्याव्यात, असे निवेदन शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. किशोर घाटगे यांनी शिवसेनेचे संसदीय गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना दिले. ‘या संदर्भात योग्य त्या सूचना देऊ’, असे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी श्री. किशोर घाटगे यांना सांगितले.