नागपूर येथील विमानतळावर ६१ लाख रुपयांचे सोने जप्त !
नागपूर – येथील कस्टम्सच्या ‘एअर कस्टम्स युनिट’ आणि ‘एअर इंटेलिजन्स युनिट’च्या पथकाने संशयित प्रवाशांची पडताळणी केली असता २ ट्रॉली बॅगांमध्ये सोने आणि चांदी जाड तारांच्या स्वरूपात लपवून ठेवलेले आढळून आले. वायरच्या स्वरूपात असलेल्या सोन्याला चांदीचा लेप दिला होता. यामुळे ते ‘बॅगेज स्क्रिनिंग यंत्रणे’वर सहज शोधता येत नाही. या कारवाईत ३८४.१०० ग्रॅम आणि ४७५.२३० ग्रॅम सोने पकडण्यात आले. या सोन्याची एकूण किंमत ६१ लाख २५ सहस्र ५४६ रुपये इतकी आहे. कतार एअरवेजने दोहाहून नागपूर येथे जात असलेल्या २ प्रवाशांकडून सोने जप्त केले आहे.