भारतात आपली उपनिषदे, पुराणे आणि धर्मशास्त्रे यांचा विस्तृत प्रमाणावर प्रचार व्हायला हवा !
स्वामी विवेकानंद यांची शिकवण
भारतात आधी येथे आध्यात्मिक विचारांचा पूर वाहू द्या. ज्याकडे आपण प्रथम लक्ष द्यावयास हवे, असे जर कोणते कार्य असेल, तर ते हेच की, आपली उपनिषदे, पुराणे आणि धर्मशास्त्रे यांतच बंदिस्त होऊन पडलेली सर्वाेत्कृष्ट सत्ये आपण ग्रंथांतून, मठांतून, अरण्यांतून आणि विशिष्ट संप्रदायांच्या कह्यातून बाहेर काढली पाहिजेत आणि संपूर्ण देशभर त्यांचा इतका विस्तृत प्रमाणावर प्रचार केला पाहिजे की, ती वणव्याप्रमाणे उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत, पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत, हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत आणि सिंधूपासून ब्रह्मपुत्रेपर्यंत अतीशीघ्र गतीने पसरतील.
(साभार : ‘स्वामी विवेकानंद म्हणतात’, रामकृष्ण मठ, नागपूर.)