स्टेनलेस स्टिलचा वापर केला असता, तर पुतळा कोसळला नसता ! – नितीन गडकरी
नवी देहली – मागच्या ३ वर्षांपासून समुद्रकिनारी उभारण्यात येणारे रस्ते आणि त्यावरील पूल यांसाठी स्टेनलेस स्टिलचा वापर करण्याचा मी सातत्याने प्रयत्न करत आहे. मी मुंबईत असतांना ५५ उड्डाण पूल बांधले होते. त्या वेळी एका व्यक्तीने मला उड्डाण पुलांची पहाणी करण्यासाठी बोलावले. पुलाच्या बांधकामात वापरण्यात येणार्या लोखंडी सळ्यांवर तो ‘पावडर कोटिंग’ करत असल्याचे दिसले. यावर प्रश्न विचारला असता तो म्हणाला की, यामुळे सळ्या गंजरोधक होतात; पण तरीही सळ्यांना गंज पकडल्याचे मला दिसले. त्यामुळे समुद्रकिनार्यापासून ३० कि.मी.च्या अंतरावर असलेल्या बांधकामात स्टेनलेस स्टिलचा वापर झाला पाहिजे, असे मत मी मांडत आलो. जर मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बांधकामात स्टेनलेस स्टिलचा वापर केला असता, तर तो पुतळा पडला नसता, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देहली येथे केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट दुर्गावर आठ महिन्यांपूर्वी उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नुकताच कोसळला. त्याचे पडसाद राज्यात उमटले. या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.