Terrorist Attacks in Pakistan : पाकिस्तानमध्ये यावर्षी आतापर्यंत झाली ३२५ आतंकवादी आक्रमणे !
इस्लामाबाद (पाकिस्तान) – भारतामध्ये(India गेल्या ४ दशकांपासून आतंकवादी कारवाया करणार्या पाकिस्तानमध्ये(Pakistan) आतंकवादी(Terrorist )आक्रमणांंमध्ये वाढ झाली आहे. यावर्षी केवळ ऑगस्ट महिन्यातच संपूर्ण पाकिस्तानमध्ये ५९ आतंकवादी आक्रमणे झाली, ज्यांत ८४ जणांचा मृत्यू झाला. जुलैमध्ये ३८ आतंकवादी आक्रमणे झाली होती. यासह संपूर्ण देशात आतंकवादी आक्रमणांची संख्या ३२५ इतकी झाली आहे.
Terrorist Attacks in Pakistan: So far 325 terrorist attacks have happened in Pakistan this year!
Pakistan has reaped what it has sown ! Due to terrorism, Pakistan has been divided into 4 parts. Since Pakistan is yet to learn from this, its destruction is now imminent !… pic.twitter.com/WmOhi6bBvY
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 5, 2024
१. ‘पाक इन्स्टिट्यूट ऑफ पीस स्टडीज’नुसार खैबर पख्तूनख्वामध्ये सर्वाधिक २९ आतंकवादी आक्रमणे झाली, तर पंजाबमध्ये २ आक्रमणे झाली. यांत ८४ जणांचा मृत्यू झाला, तर १६६ जण घायाळ झाले.
२. गेल्या १२ वर्षांत आतापर्यंत २४ सहस्र ३७३ लोकांचा आतंकवादी आक्रमणांत मृत्यू झाला आहे.
३. वर्ष २००६ पासून आतापर्यंत १७ सहस्र ८४६ आतंकवादी घटना घडल्या आहेत, ज्यांमध्ये २४ सहस्र ३७३ लोकांचा मृत्यू झाला, तर ४८ सहस्र ८५ लोक घायाळ झाले.
४. खैबर पख्तुनख्वामध्ये झालेल्या २९ आतंकवादी आक्रमणांमध्ये २५ जणांना जीव गमवावा लागला, तर ८० जण घायाळ झाले. येथे प्रतिबंधित आतंकवादी गट तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी), हाफीज गुल बहादूर गट, लष्कर-ए-इस्लाम, इस्लामिक स्टेट-खोरासान (आय.एस्.-के) आणि स्थानिक तालिबान गटाने आक्रमणे केली. पंजाबमधील २ आक्रमणांमध्ये २ नागरिक घायाळ झाले, तर २ आतंकवादी ठार झाले.
संपादकीय भूमिकापाकने जे पेरले, तेच त्याच्या देशात उगवले आहे ! याच आतंकवादामुळे पाकचे ४ तुकडे होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. यातून पाक अजूनही धडा घेत नाही. त्यामुळे त्याचा आत्मघात निश्चित आहे ! |