दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : चारचाकीने महिलेला उडवले !; आरोपीला जामीन संमत !…
चारचाकीने महिलेला उडवले !
मुंबई – मालाडमध्ये पुन्हा एकदा एका आलीशान चारचाकीने एका निष्पाप २७ वर्षीय महिलेचा जीव घेतला आहे. चालकाने महिलेला धडक दिली आणि मग तिला दुभाजकापर्यंत फरफटत नेले. नागरिकांनी चालकाला बेदम मारहाण करून गाडीच्या काचाही फोडल्या.
आरोपीला जामीन संमत !
मुंबई – कुलाबा येथे रहाणार्या आरोपीवर २९ वर्षीय प्रेयसीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप होता; परंतु ‘लिव्ह इन रिलेशनशीप’मध्ये रहातांना आपण ‘प्रेमाचा करारनामा’ केला होता, असा युक्तिवाद करत आरोपीने करार सादर केला. यातील अटी वाचून मुंबई सत्र न्यायालयाने आरोपीला अटकपूर्व जामीन संमत केला.
मुलावर लैंगिक अत्याचार !
मुंबई – गोवंडीतील मानखुर्द परिसरात १२ वर्षीय मुलावर शरद साबळे याने मद्याच्या नशेत लैंगिक अत्याचार केला आहे. या प्रकरणी अल्पवयीन पीडित मुलाच्या नातेवाइकांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांनी घटनेच्या ६ घंट्यांनंतर प्रथमदर्शनी अहवाल नोंदवला. वैद्यकीय तपासणी न करता पीडित मुलाला मध्यरात्रीपर्यंत पोलीस ठाण्यात ठेवण्यात आल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. (असंवेदनशील पोलीस ! – संपादक)
नितेश राणे यांच्यावर भिवंडी येथे गुन्हा नोंद
ठाणे – ‘मशिदींत घुसून मारू’ असे विधान केल्याच्या कारणावरून आमदार नितेश राणे यांच्याविरोधात भिवंडी येथील भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. भिवंडी येथील एका २० वर्षीय मुलाने याविषयी तक्रार केली. हा गुन्हा नगर येथील तोफखाना पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.
मुसलमान धर्मियांविषयी अपकीर्तीकारक घोषणा देऊन राणे यांनी धार्मिक भावना दुखावल्याचे या तक्रारीत म्हटले आहे.