रहाटणी (पिंपरी) येथे १२ वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार !
पिंपरी (पुणे) – येथील रहाटणी परिसरात गोड बोलून १२ वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार केला आहे. या प्रकरणी वाकड पोलिसांनी उदय लोखंडे याला अटक केली आहे. पीडित मुलाच्या वडिलांनी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट (दाखल) केली आहे. पीडित मुलगा रहाटणी बसथांब्यापासून गोडांबे चौकाकडे जात होता. उदय याने दुचाकीवरून घरी सोडतो, असे सांगून मुलाला गाडीवर बसवले आणि सांगवी मैदानाजवळील एका रिकाम्या खोलीमध्ये नेऊन त्याच्यावर अत्याचार केला.
संपादकीय भूमिका :मुलावर अनैसर्गिक अत्याचार करण्यासारखी विकृती निर्माण होणे, हा मेकॉलेप्रणित शिक्षणप्रणालीचा दुष्परिणाम ! |