महिलेची अश्लील छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी देऊन पावणे तीन लाख रुपये उकळले !
संशयित आरोपीस पोलीस कोठडी
कणकवली – तालुक्यातील एका गावातील विवाहित महिलेची तिच्या नकळत अश्लील छायाचित्रे काढून ती प्रसारित (व्हायरल) करण्याची धमकी दिली, तसेच तिच्याकडून २ लाख ७० सहस्र रुपये उकळल्याच्या प्रकरणी संशयित आरोपी रवींद्र नामदेव राऊळ या तरुणाला येथील न्यायालयाने २ सप्टेंबर या दिवशी ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
मुंबई येथे कामानिमित्त वास्तव्यात असलेली महिला वर्ष २०२२ मध्ये गावी आली होती. त्या वेळी ती स्नान करत असतांना गावातीलच एका संशयिताने तिच्या नकळत तिची अश्लील छायाचित्रे काढली होती. काही दिवसांनी ती त्याने महिलेला दाखवली आणि ती प्रसारित करण्याची धमकी देत तिच्याकडून टप्प्याटप्प्याने २ लाख ७० सहस्र रुपये उकळले. त्यानंतर ती महिला मुंबई येथे गेली. २७ ऑगस्ट या दिवशी पुन्हा ती महिला गावी आल्यावर संशयिताने तिला वाटेत अडवून तिचा विनयभंग केला आणि तिच्याकडे पुन्हा पैशांची मागणी केली. त्यामुळे त्या महिलेने संशयिताच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली. संशयिताच्या भ्रमणभाषच्या लोकेशनवरून तो दिवा (मुंबई) येथे असल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी त्याला कह्यात घेतले.
संपादकीय भूमिकामहिलेची अश्लील छायाचित्रे काढून तिच्याकडून पैसे उकळणे, ही घटना धर्मशिक्षणाअभावी समाजाची नैतिकतेअभावी झालेली अधोगती दर्शवते ! |