Anti-Rape Bill Passed : बंगाल विधानसभेत बलात्कारविरोधी विधेयक संमत
कोलकाता – बंगाल(Bengal) विधानसभेने ‘अपराजिता’ (Aparajita Woman) बलात्कारविरोधी विधेयक एकमताने संमत केले. विरोधकांनीही या विधेयकाला पूर्ण पाठिंबा दिला. सरकारी आर्.जी. कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात गेल्या महिन्यात एका महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या घटनेनंतर विधानसभेचे विशेष सत्र बोलावण्यात आले होते. राज्याचे कायदामंत्री मलय घटक(Moloy Ghatak) यांनी हे विधेयक मांडले. या विधेयकात बलात्काराच्या घटनेत पीडितेचा मृत्यू झाला किंवा ती कोमात गेली, तर दोषींना फाशीच्या शिक्षेचे प्रावधान (तरतूद) करण्यात आले आहे.
बलात्कार आणि हत्या करणार्या गुन्हेगाराला मृत्यूदंड !
या विधेयकानुसार, बलात्कार आणि हत्या करणार्या गुन्हेगाराला फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे. अशा प्रकरणांमध्ये पोलिसांना २१ दिवसांत तपास पूर्ण करावा लागणार आहे. या विधेयकात दोषींवर आरोपपत्र प्रविष्ट (दाखल) केल्यानंतर ३६ दिवसांच्या आत मृत्यूदंडाच्या शिक्षेचे प्रावधान आहे. या विधेयकात गुन्हेगाराला साहाय्य केल्यास ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा दिली जाणार आहे.