…तर मग नास्तिकवाद्यांना सश्रद्ध समाजाची भावना दुखावण्याचा अधिकार कसा प्राप्त होतो ?
देवा-धर्माची टिंगलटवाळी सभेतून, व्याख्यानातून उघडपणे करणारे नास्तिक विद्वान मुलाची मुंज थाटामाटाने करतात आणि त्यासाठी समाजवादी पक्षाने दिलेली दूषणे निमूटपणे स्वीकारतात. ‘तुम्ही नास्तिक, मग उपनयन संस्कार का केला ?’, असे विचारले, तर ‘आईच्या, पत्नीच्या आग्रहास्तव असे करणे भाग झाले’, असे म्हणतात. आई आणि पत्नी यांच्या श्रद्धेच्या जपणुकीची भावना बाळगणार्या नास्तिकाला समाजातील ९५ टक्क्यांहून अधिक असलेल्या भावना कटु शब्दाने दुखावण्याचा अधिकार कसा प्राप्त होतो, हे कळत नाही. ही दांभिकता विलक्षण आहे.
– प.पू. स्वामी वरदानंद भारती (साभार : ‘वरदवाणी’)