Bangladesh ‘Jamaat-e-Islami’ : (म्हणे) ‘बांगलादेशातील ‘जमात-ए-इस्लामी’, हा एक सुसंघटित राजकीय पक्ष !’ – चीन
ढाका (बांगलादेश) – बांगलादेशातील ( Bangladesh) अवामी लीगचा जवळचा मित्र म्हणवणार्या चीनने(China) त्याच्या भूमिकेत पालट केल्याचे दिसून आले. चीनचे बांगलादेशातील राजदूत याओ वेन यांनी नुकतीच सत्ता हाती घेतलेला ‘जमात-ए-इस्लामी’ (Jamaat-e-Islami) हा एक सुसंघटित राजकीय पक्ष असल्याचे म्हटले आहे. त्यांनी नुकतेच ढाका(Dhaka) येथील जमात-ए-इस्लामीच्या केंद्रीय कार्यालयाला भेट दिली आणि जमातचे अमिर शफीकुर रहमान यांच्याशी चर्चा केली. या वेळी चिनी राजदूताने बांगलादेशाला ‘सुंदर देश’ म्हणून गौरवले आणि ‘जमात-ए-इस्लामी’चे कौतुक केले. चिनी राजदूत म्हणाले की, आम्हाला बांगलादेशाच्या लोकांशी मैत्रीपूर्ण संबंध हवे असून आम्ही बांगलादेशाचा विकास, प्रगती आणि समृद्धी यांसाठी काम करत राहू.
शेख हसीना (Sheikh Hasina) यांच्या कार्यकाळात भारतानंतर चीन हा अवामी लीगचा जवळचा मित्र मानला जात होता. शेख हसीना यांचे चीनसमवेत अतिशय दृढ संबंध होते. तथापि, शेख हसीना यांच्या सत्तापतनानंतर डॉ. महंमद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारशी सहकार्याची चर्चा करणार्या काही देशांपैकी चीन एक आहे.
संपादकीय भूमिकाचीन डावपेचात हुशार ! भारताला शह देण्यासाठी बांगलादेशाशी जवळीक साधणार्या चीनचा धूर्तपणा ओळखा ! |