Smoking and drinking by children in school : बिक्कोडा (कर्नाटक) येथील शालेय विद्यार्थ्यांच्या वसतीगृहात मुलांकडून धूम्रपान आणि मद्यपान !

वसतीगृहात मुलांकडून धूम्रपान

हासन (कर्नाटक) – बेलुरू तालुक्यातील बिक्कोडा येथील १० वी पूर्व सरकारी मुलांच्या वसतीगृहातील मुलांचा नशेत असलेला व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित झाला आहे. वसतीगृहातील कर्मचार्‍यांच्या अनुपस्थितीत मुले धूम्रपान आणि मद्यपान करत असल्याचे यात दिसत आहे. यासह ‘व्हाईटनर’चेही (कागदावरील लिखाण पुसण्यासाठी वापरण्यात येणारा पांढरा रंगाचा द्रव पदार्थ) सेवन करतांना दिसत आहेत.

येथे वसतगृहाच्या गच्चीवर मद्याच्या बाटल्या आढळल्या आहेत. इतकेच नाही, तर मुले अमली पदार्थांचेही सेवन करत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी नागरिकांनी वसतीगृहाचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्याविषयी संताप व्यक्त केला आहे.

संपादकीय भूमिका

विद्यार्थ्यांना धर्मशिक्षण देऊन त्यांच्याकडून साधना करवून घेण्यात येत नसल्याने त्यांना जीवनातील नेमका आनंद काय आहे ? आणि तो कसा मिळवायचा ? हेच कळत नाही आणि ते व्यसनातून आनंद शोधण्याचा प्रयत्न करतात अन् जीवनाची राखरांगोळी करून घेतात !