Uttarakhand Mob Vandalise Muslim Shop : हिंदु मुलीला अश्लील हावभाव करून दाखवणार्या आरिफच्या दुकानाची लोकांनी केली तोडफोड !
चमोली (उत्तराखंड) येथील घटना
चमोली (उत्तराखंड) – येथील नंदनगरमध्ये केशकर्तनालय चालवणार्या आरिफ नावाच्या तरुणाने अल्पवयीन हिंदु मुलीला अश्लील हावभाव करून दाखवल्यावरून पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी संतप्त जमावाने मोर्चा काढत या दुकानाची तोडफोडही केली. आरिफ पसार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
Angry mob at vandalize Arif’s shop, after the bigot was found displaying obscene gestures to a Hindu girl.
📍Chamoli (Uttarakhand)
Is one being unreasonable for believing, that people take up law into their hands, because such lustful people are not punished immediately and… pic.twitter.com/hMHH1gCnxw
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 3, 2024
मुलीच्या पालकांनी तक्रारीत म्हटले आहे की, सलून चालवणारा २४ वर्षीय आरिफ अनेक दिवसांपासून पीडितेशी अश्लील हावभाव करत होता. आधी पीडितेने या कृत्यांकडे दुर्लक्ष केले. काही दिवसांनी आरिफने पुन्हा एकदा पीडितेला अश्लील हावभाव केले. या वेळी पीडितेने याची माहिती आईला दिली. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार प्रविष्ट (दाखल) करून आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.
हिंदु संघटनेच्या सदस्यांसह स्थानिक जनतेला या घटनेची माहिती मिळाली. या घटनेच्या निषेधार्थ लोकांनी मोर्चा काढला आणि नंतर आरिफच्या दुकानाची तोडफोड केली.
संपादकीय भूमिका‘अशा वासनांधांना तात्काळ आणि कठोर शिक्षा होत नसल्याने जनतेने कायदा हातात घेतला, तर त्याला पोलीस, प्रशासन, सरकार आणि न्यायव्यवस्थाच उत्तरदायी आहे’, असे कुणी म्हटले, तर आश्चर्य ते काय ? |