चिपळूण (जिल्हा रत्नागिरी) येथील श्री. विनायक कांगणे यांना आलेल्या अनुभूती
१. व्यवहारातील अडचणी प्रयत्न करूनही न सुटणे; मात्र अधिकाधिक सेवा करण्याचा प्रयत्न केल्यावर अडचणी आपोआप सुटणे
‘मला व्यवहारात पुष्कळ अडचणी येत असत. मी त्या सोडवण्याचा पुष्कळ प्रयत्न करत असे; परंतु प्रयत्न करूनही माझ्या अडचणी सुटत नव्हत्या. मला आणखी अडचणी येत होत्या. ‘हे सर्व माझ्या प्रारब्धानुसार घडत आहे’, असे माझ्या लक्षात आले. त्यानंतर मी या अडचणींकडे दुर्लक्ष करून अधिकाधिक सेवा करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ‘कितीही अडचणी आल्या, तरी नंतर सर्व अडचणी दूर होत आहेत’, असे माझ्या लक्षात आले. मी आता माझ्या अडचणींकडे लक्ष न देता अधिकाधिक सेवा कण्याचा प्रयत्न करतो.
२. ‘प.पू. गुरुदेव हृदय सिंहासनावर विराजमान आहेत’, असा भाव टिकून रहाणे
मी दुचाकीेने प्रवास करतो, आस्थापनात काम करतो किंवा प्रसारासाठी बाहेर जातो, तेव्हा प.पू. गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) माझ्या समवेत आहेत’, असे मला जाणवते. ‘प.पू. गुरुदेव माझ्या हृदय सिंहासनावर विराजमान आहेत’, असा माझा भाव टिकून रहातो.
‘प.पू. गुरुदेव, मला आपल्या चरणांजवळ ठेवावे आणि मला नेहमी सत्सेवा करता यावी’, अशी आपल्या चरणी प्रार्थना !’
– श्री. विनायक कांगणे, चिपळूण, रत्नागिरी. (९.७.२०२४)
|