महिलांची प्रगती ही देशाची उन्नती आणि विकास यांमध्ये महत्त्वाची ! – राष्ट्रपती
वारणानगर (जिल्हा कोल्हापूर) – भारतात अनेक सहकारी संस्था असून त्यात युवा पिढीने सहभागी होणे आवश्यक आहे. वारणामधील महिला समुहाचा सोहळा पार पडत असून महिलांचे सामाजिक स्थान वाढण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. अनेक संस्था आज महिलांसाठी कार्यरत आहेत. आज महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे येत आहेत. महिलांची प्रगती ही देशाची उन्नत्ती आणि विकास यांमध्ये महत्त्वाची आहे. आपल्यासमवेत सर्व महिलांना प्रगतीपथावर आणणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले. २ सप्टेंबरला वारणा उद्योग समुहाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या वेळी त्यांनी वारणा उद्योग समुहाचे कौतुक केले.
प्रास्ताविक वारणा उद्योग समुहाचे प्रमुख आणि ‘जनसुराज्य शक्ती पक्षा’चे आमदार श्री. विनय कोरे यांनी केले. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उपस्थितांना संबोधित केले. या प्रसंगी विविध मान्यवर उपस्थित होते.