UP Love Jihad : जौनपूर (उत्तरप्रदेश) येथे मुसलमान तरुणाकडून अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण
जौनपूर (उत्तरप्रदेश ) – येथील एका गावात ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण समोर आले आहे. येथील एका मुसलमान तरुणाने एका १७ वर्षीय हिंदु मुलीचे अपहरण केल्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी केली आहे. पोलीस ठाण्याचे प्रभारी दिव्य प्रकाश सिंह यांनी सांगितले की, या तक्रारीच्या आधारे आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ‘पीडित मुलीने फसवणुकीचा आरोप केल्यास हे ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण असल्याचे स्पष्ट होईल’, असे त्यांनी सांगितले.
३१ ऑगस्ट या दिवशी बुरखा घातलेली एक हिंदु तरुणी तिच्या मुसलमान प्रियकरासमवेत लग्न करण्यासाठी न्यायालयात पोचल्याने जौनपूरच्या न्यायालयात एकच गोंधळ उडाला. मुलीने कपाळावर कुंकूही लावले होते. मुलगी अल्पवयीन असल्याचे कळताच उपस्थित लोकांना यात काळेबेरे असल्याचा संशय आला. पोलिसांनी न्यायालय गाठून दोघांनाही कह्यात घेतले.
आरोपी मुसलमान तरुणाचे अल्पवयीन असलेल्या हिंदु तरुणीशी प्रेमसंबंध होते. २९ ऑगस्ट या दिवशी मुसलमान तरुणाने हिंदु मुलीचे अपहरण केले. मुलीच्या वडिलांनी मुलाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदवला. पोलीस दोघांचा शोध घेत होते. याच कालावधीत आरोपी मुसलमान तरुण बुरखाधारी पीडित हिंदु मुलीमवेत न्यायालयात पोचला. लोकांनी त्यांना पहाताच तेथे गोंधळ चालू झाला आणि त्याविषयी पोलिसांना सूचित करण्यात आले. या प्रकरणी अन्वेषण चालू आहे, असे पोलीस निरीक्षक दिव्य प्रकाश सिंह यांनी सांगितले.
संपादकीय भूमिकाउत्तरप्रदेशमध्ये लव्ह जिहादविरोधी कायदा असूनही लव्ह जिहाद्यांवर कठोर कारवाईच होत नसल्यामुळे त्यांचे वारंवार असे कृत्य करण्याचे धाडस होते. हे पोलिसांना लज्जास्पद ! |