हिंदु दर्शन
१. आस्तिक दर्शन
जे वेदांना आपला जीवन आधार मानतात.
अ. पूर्वमीमांसा : जैमिनी ऋषि : ज्यात कर्म आणि उपासनेचा विचार आहे.
आ. उत्तरमीमांसा : श्रीव्यास ऋषि : ज्यामध्ये ज्ञान आणि उपासना यांचा विचार आहे. ब्रह्मसूत्र तथा वेदांचे अंतिम तात्पर्य सांगण्यासाठी ‘वेदांत दर्शन’ त्यास म्हटले जाते. वेदांचे ‘उपनिषद’, ‘ब्रह्मसूत्र’ आणि ‘भगवद्गीता’ हे ३ प्रस्थानत्रयी मुख्य प्रमाणित ग्रंथ आहेत.
इ. वैशेषिक : कणाद ऋषि : पदार्थांचे चिंतन द्रव्य, ९ द्रव्ये (पृथ्वी, जल, अग्नि, वायु, आकाश, काल, दिशा, आत्मा आणि मन) अन् त्यांचे गुणधर्म, रूप, रस, गंध, स्पर्श, सुख, दुःख, इच्छा, स्नेह, द्वेष, प्रयत्न, संस्कार, गुरुत्व इत्यादी २४ गुणांचे चिंतन.
ई. न्याय : गौतममुनी – वैशेषिकची विस्तृत व्याख्या न्यायदर्शनामध्ये आहे. वेगवेगळ्या प्रमाणांच्या आधारे तत्त्वांची परीक्षा न्यायदर्शनामध्ये केली गेली आहे. वैशेषिक आणि न्याय या दोन्ही दर्शनांचा सिद्धांत परमाणुवाद आहे. अर्थातच सार्या स्थूल पदार्थांचे मूळ कारण सूक्ष्म परमाणू आहे. दोन्ही दर्शनांमध्ये जड पदार्थांचे वास्तविक स्वरूप जाणून घेण्यासाठी योग साधनेचा आधार घ्यावा, असे सांगितले आहे.
उ. सांख्य : कपिलमुनी
ऊ. योग : महर्षि पतंजली : सांख्य आणि योग भारताचे प्राचीन वेदांत दर्शन आहेत. वेदांत म्हणजेच ज्ञानाचा अंत. ज्यामुळे हे जाणून घेतल्यावर पुन्हा काही ज्ञान मिळवण्याचे शिल्लक रहात नाही.
महर्षि पतंजली यांनी लिहिलेल्या ग्रंथात ‘सांख्य’ आणि ‘योग’ या ज्ञानाला समजून घेण्याचे मार्ग विशेष रूपाने सांगितले आहेत.
२. नास्तिक दर्शन
जे वेदांना आपला आधार मानत नाहीत.
अ. बौद्ध : गौतम बुद्ध
आ. जैन : भगवान महावीर
इ. चार्वाक : महर्षि बृहस्पति
ई. आजीवक : महर्षि गोशाला
३. वेदांताचे भाष्यकार असणारे आचार्यांद्वारे निर्माण केलेले संप्रदाय
प्रस्थानत्रयी (उपनिषद, ब्रह्मसूत्र आणि भगवद्गीता) यावर अनेक आचार्यांनी आपापल्या अनुभूतींद्वारे ५ नवीन संप्रदाय चालू केले. हे सर्व संप्रदाय प्रस्थानत्रयीला अनुरूप मानले जातात.
अ. अद्वैत : भाष्यकार, जगद्गुरु स्वामी शंकराचार्यजी
आ. विशिष्टाद्वैत : भाष्यकार, जगद्गुरु स्वामी रामानुजाचार्य
इ. द्वैत : भाष्यकार, जगद्गुरु स्वामी मध्वाचार्य
ई. शुद्ध अद्वैत : भाष्यकार, जगद्गुरु स्वामी वल्लभाचार्य.’
(साभार : संकेतस्थळ)