बटेंगे तो कटेंगे । (विभागले गेलो, तर कापले जाऊ !)
उत्तरप्रदेशचे कणखर मुख्यमंत्री तथा भाजप नेते योगी आदित्यनाथ यांचे ‘बटेंगे तो कटेंगे’, हे विधान, म्हणजे मुसलमान समाजाचे अंतरंग स्पष्ट करणारे विधान आहे. तेही केवळ ३ शब्दांमध्ये त्यांनी स्पष्ट केले आहे. ‘मुसलमान समाजाच्या तावडीतून स्वतःची सुटका करायची असेल आणि स्वतःचे अस्तित्व संस्कृती, धर्म अन् राष्ट्रासह अबाधित राखायचे असेल, तर हिंदूंना संघटित होण्यापासून दुसरा पर्याय रहात नाही’, असा आशय एक प्रकारे योगी आदित्यनाथ यांनी सांगितला आहे.
१. ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी’च्या अध्यक्षा बेगम खलिदा झिया यांनी हिंदु आणि बौद्ध धर्मीय यांना दिलेली चेतावणी
मुसलमान समाज हा स्वतःच्या समाजाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही समाजाला कोणत्याही प्रकारची सवलत देत नाही. त्यांच्याशी माणुसकीने, मानवतेने वागण्यास त्यांचा धर्मग्रंथ त्यांना अनुमती देत नाही. मुसलमानेतर समाजाशी वैर जोपासण्याची आज्ञा त्यांचा धर्मग्रंथ देतो. लोकशाही, विचारस्वातंत्र्य, आचारस्वातंत्र्य या सभ्य समाजातील व्यक्तीस्वातंत्र्याला इस्लामी राज्यात कोणतेही स्थान नाही. याचे उत्तम उदाहरण, म्हणजे सध्या बांगलादेशात रहाणार्या हिंदु आणि बौद्ध धर्मियांची हत्या चालू आहे. त्याविषयी बांगलादेशातील ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी’च्या अध्यक्षा बेगम खलिदा झिया यांनी समाजमाध्यमांवर बांगलादेशात होणार्या हिंदूंच्या आणि बौद्धांच्या हत्याकांडाविषयी दुःख व्यक्त करतांना लिहिले…
‘I regrate the cotinuing massacre of Hindus and Buddhists in Bangaladesh, but Bangladesh is an Islamic Nation and not secular. Now the muslims are in majority here. Under the circumstances if Hindus and Buddhists want to live safely, they should either convert to Islam or go to India.’ (आशय : बांगलादेशात सातत्याने होणारे हिंदु आणि बौद्ध यांचे हत्याकांड याचे मला दुःख होत आहे; पण बांगलादेश एक इस्लामी राष्ट्र आहे, निधर्मी राष्ट्र नाही. आता मुसलमान समाज हा इथे बहुसंख्य आहे. अशा परिस्थितीत हिंदु आणि बौद्ध यांना जर सुरक्षितपणे जीवन जगायचे असेल, तर त्यांनी इस्लाम धर्माचा स्वीकार करावा किंवा भारतात निघून जावे.)
बांगलादेशातील ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी’च्या महिला अध्यक्षांना वाटणारे दुःख, हे अत्यंत नाटकी आहे. खरे तर त्यांचे हे दुःख म्हणजे मगरीचे अश्रू आहेत. समाजमाध्यमांवर त्यांनी व्यक्त केलेले विचार, म्हणजे इस्लामला लोकशाही आणि व्यक्तीस्वातंत्र्य अमान्य असल्याचा तो दाखला आहे. ‘मुसलमान समाज हा अन्य मानवी समाजाला सुखाने जगू न देणारा समाज आहे’, याचा कबुलीजबाब त्यांनी त्यांच्या या संदेशातून दिला आहे.
२. बॅरिस्टर खालिद उमर यांनी इस्लामी राजवटीविषयी स्पष्ट केलेले खरे स्वरूप !
खरोखरच इस्लामला लोकशाही अमान्य आहे. जगातील कोणत्याही इस्लामी देशात आपल्याला लोकशाही अस्तित्वात असल्याचे आढळून येत नाही. काही वर्षांपूर्वी लंडनमधील बॅरिस्टर खालिद उमर यांनी समाजमाध्यमांवर एका लेखातून हेच स्पष्ट केले होते. त्या लेखात त्यांनी लिहिले….
‘जगात एकूण ५७ इस्लामी राष्ट्रे आहेत. त्यांपैकी एकाही राष्ट्रात निधर्मी लोकशाही नाही. इस्लामचा इतिहास लक्षात घेतला, तर इस्लामी सत्तेचे वारस हे विश्वासघातकी कृत्ये, विष, तलवार, हत्या, फाशी देणे अथवा सत्ता पालट यांतून सत्तेवर आले आहेत. त्यामुळे इस्लामच्या राजवटीखाली जो समाज आहे, तो सामाजिक आणि बौद्धिक दृष्टीकोनातून लोकशाहीसाठी योग्य समाज नाही. बाहरीन, कतार, सौदी अरेबिया या आणि अशांसारख्या अनेक देशात राजकीय पक्षांवर बंदी आहे.’
याच लेखात बॅरिस्टर खालिद उमर म्हणतात, ‘इस्लामच्या राजवटीत अल्लाच्या नावाने एकाधिकारशाही असते, ज्यात लोकांवर प्रभाव असणार्याला, म्हणजेच कुराणानुसार राज्य करण्याचा सार्वभौम अधिकार असतो. आज त्याला आपण ‘मार्शल लॉ’ (लष्करी कायदा) असे म्हणतो. तिथे शिरगणती होत नाही, तर शिरच्छेद होतो.’
३. बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी यांचे फुत्कार
‘एम्.आय.एम्.’ या राजकीय पक्षाचे अध्यक्ष खासदार बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी अलीकडेच काय म्हणाले होते, त्याचे स्मरण करून देणे इथे सयुक्तिक ठरेल, ‘या देशात कायम पंतप्रधान पदावर मोदी किंवा मुख्यमंत्री पदावर योगी आदित्यनाथ असणार नाहीत. ते या पदावरून गेले, तर मग आम्ही काय करतो, ते पहा.’ अशा अर्थाचे त्यांचे उद्गार बांगलादेशातील ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी’च्या अध्यक्षा बेगम खलिदा झिया यांनी समाजमाध्यमांवर बांगलादेशातील हिंदु आणि बौद्ध यांच्या होणार्या हत्याकांडाविषयी जे उद्गार काढले त्याच्याशी साधर्म्य असलेले असदुद्दीन ओवैसी यांचे उद्गार आहेत.
४. मुसलमानांचे दुटप्पी धोरण
मुमताज अहमद यांचा ‘फंडामेंटालिझम, रिव्हालिस्टस् अँड व्हायलन्स इन साऊथ आशिया’ (Fundamentalism, Rvivalists & Violence In South Asia), या नावाचा एक ग्रंथ आहे. त्या ग्रंथात मुसलमानी राजकारणाचा दुटप्पीपणा व्यक्त करणारा एक परिच्छेद त्यांच्या ग्रंथात आढळतो. ‘What is most interesting to note is that while the Jama at in Pakistan denounces secularism as an evil force and the greatest threat to Islam. The Jama at of India is equally vigorous in defending secularism as a blessing & as a gurantee for the safe future for Islam in India.’ (आशय : सर्वांत चित्तवेधक नोंदवून ठेवण्यायोग्य गोष्ट, म्हणजे पाकिस्तानमधील जमाच्या लेखी पाकिस्तानमध्ये सर्वधर्मसमभाव, म्हणजे सैतानी शक्तीने पाकिस्तानला घातलेला धाक आहे. हिंदुस्थानातील जमा मात्र सर्वधर्मसमभावाचा जोरदार पुरस्कार करतांना आढळून येते; कारण हिंदुस्थानात असलेला सर्वधर्मसमभाव मुसलमानांसाठी आशीर्वाद असून हिंदुस्थानात इस्लाम भविष्यात सुरक्षित रहाण्याची हमी देणारा आहे.
(संदर्भ : ‘हिंदुत्व आणि इतर विचारधारा’, लेखक : ज. द. जोगळेकर, प्रकाशक : मनोरमा प्रकाशन, प्रथम आवृत्ती, वर्ष १९९६))
हे संदर्भ लक्षात घेतले की, मुसलमान समाज लोकशाही आणि निधर्मीवादाचा तिरस्कार करणारा समाज आहे.
५. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेल्या चेतावणीकडे हिंदूंनी लक्ष देण्यामागील महत्त्वपूर्ण हेतू
इस्लामी जगताकडे दृष्टीक्षेप टाकला की, ही गोष्ट आपल्या लक्षात येते, तसेच युरोप खंडात मुसलमान समाज बहुसंख्य होताच काय परिस्थिती निर्माण झाली आहे, ते चित्रही अत्यंत बोलके आहे. या पार्श्वभूमीवर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ‘बटेंगे तो कटेंगे’, अशी चेतावणी देऊन हिंदूंना संघटित होण्याचे आवाहन करतात, तेव्हा त्यामागचा त्यांचा हेतू आपण लक्षात घेतला पाहिजे. त्यांच्या या चेतावणीकडे दुर्लक्ष केले, तर आपल्यावर पुनश्च पारतंत्र्यात जाण्याची वेळ येईल. तशी वेळ आपल्यावर येऊ नये; म्हणून मुसलमानांच्या बोलण्यावर विश्वास ठेवायचा नाही आणि मुसलमानांची बाजू घेणार्या देशातील हिंदु नेत्यांना मतदान करायचे नाही. हिंदु समाज पूर्णपणे संघटित झाला, तर मुसलमानांचे या देशाचे इस्लामी राष्ट्रात रूपांतर करण्याचे स्वप्न धुळीला मिळाल्यावाचून रहाणार नाही.
६. हिंदु समाजाने बोध घेण्याची आवश्यकता !
देशातील हिंदु जनतेने योगी आदित्यनाथ यांची चेतावणी जाणून संघटित होणे नितांत आवश्यक आहे. हिंदूंसाठी हा काळ अत्यंत कसोटीचा आहे. ऐक्य, एकता आणि संघटनशक्ती यांचे बळ मुसलमानांच्या पाशवी आक्रमकतेला पराभूत करण्यास समर्थ आहे. सिंहांच्या एका कळपाने एका म्हशीवर आक्रमण केले. ती एकटी म्हैस त्या कळपाशी झुंज देत होती आणि स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करत होती; पण ती म्हैस त्या सिंहांच्या कळपाला शरण गेली नाही. तिने आपला संघर्ष चालूच ठेवला. थोड्याच वेळात म्हशींचा एक कळप तिथे आला आणि त्या कळपाने सिंहाच्या कळपावर आक्रमण केले. अचानक झालेले हे जोरदार आक्रमण सिंहाच्या कळपाला अनपेक्षित होते. अखेरीस वनराज म्हणून ओळखल्या जाणार्या सिंहांच्या कळपाला स्वतःचा बचाव करण्यासाठी पळून जावे लागले. हे दाखवणारी एक चित्रफित समाजमाध्यमांवर सर्वत्र आढळते. यातून हिंदु समाजाने बोध घ्यावा आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ‘बटेंगे तो कटेंगे’, या चेतावणीकडे गांभीर्याने पाहून म्हशींच्या कळपाचे अनुकरण करावे.
– श्री. दुर्गेश जयवंत परूळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली. (२८.८.२०२४)
संपादकीय भूमिकाधर्मांधांच्या आक्रमकतेला पराभूत करण्यासाठी हिंदूंनी ऐक्य, एकता आणि संघटनशक्ती यांचे बळ वाढवणे महत्त्वाचे ! |