प्रत्येकात असलेले ईश्वरत्व जागृत करा !
वेदांताची प्रकाशदायी, जीवनदायी तत्त्वे घरोघर पोचवा आणि प्रत्येक जीवामध्ये अव्यक्त असलेले ईश्वरत्व जागृत करा; मग तुम्हाला मिळालेल्या यशाचे प्रमाण अल्प असो वा अधिक असो, तुम्हाला हे समाधान लाभेल की, तुम्ही स्वतःचे जीवन एका महान आदर्शासाठी व्यतित केले, त्याच्याचसाठी तुम्ही प्राणपणाने प्रयत्न केला अन् तुम्ही स्वतःच्या जीवनाचे बलीदान केले. प्रत्येक प्रयत्नाने प्राप्त केलेल्या या कार्यातील यशावरच मानवजातीचा ऐहिक उद्धार आणि पारलौकिक कल्याण ही दोन्ही अवलंबून आहेत.
(साभार : ‘स्वामी विवेकानंद म्हणतात’, रामकृष्ण मठ, नागपूर.)