या जन्मी तरी श्रीराम भेटू दे !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हे गुरुमाऊली, ठाऊक नाही कोणता क्षण ।
शेवटचा असेल ।।
पण प्रत्येक क्षणी तुझ्या ।
चरणांजवळच राहू दे ।। १ ।।

कु. अनिता लोळसुरे

ठाऊक नाही कोणता श्वास ।
शेवटचा असेल ।।
पण प्रत्येक श्वास तुझ्या ।
चरणी समर्पित होऊ दे ।। २ ।।

ठाऊक नाही कोणता जन्म ।
शेवटचा असेल ।।
पण प्रत्येक जन्म तुझ्या सवे ।
तुझ्या चरणसेवेसाठीच होऊ दे ।। ३ ।।

शबरीची भक्ती माझी ।
श्रीराम तुम्ही माझे ।
कित्येक जन्मांची प्रतीक्षा माझी ।
या जन्मी तरी संपू दे ।। ४ ।।

प्रतिदिन घालते ।
फुलांच्या पायघड्या ।।
या जन्मी तरी श्रीराम भेटू दे ।
या जन्मी तरी श्रीराम भेटू दे ।। ५ ।।

– कु. अनिता लोळसुरे, निपाणी, बेळगाव (६.१.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक