Pakistan Threatens India : शत्रुत्वाच्या हेतूने कारवाई केल्यास ठोस उत्तर देण्याची पाकची भारताला धमकी !
इस्लामाबाद – भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांची चेतावणी पाकिस्तानला चांगलीच झोंबली आहे. डॉ. जयशंकर यांनी येथे एका कार्यक्रमात बोलतांना ‘पाकिस्तानशी चर्चा करण्याचा काळ संपला आहे. आता पाकिस्तानला त्याच्याच भाषेत प्रत्युत्तर मिळेल’, असे वक्तव्य केले होते. याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना ‘काश्मीर हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील वादग्रस्त सूत्र आहे. पाकिस्तान कूटनीती आणि चर्चेसाठी कटीबद्ध आहे; पण शत्रुत्वाच्या हेतूने कारवाई केली, तर ठोस उत्तर देऊ’, असे पाकिस्तानने म्हटले आहे.
Pakistan will respond with resolve to any hostile actions –
Mumtaz Zahra Baloch, Spokesperson, Pakistan Foreign OfficeWhen will India respond to Pakistan's repeated threats in a language that resonates with them ?#WorldNews pic.twitter.com/ICZ09GuK6Q
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 2, 2024
पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाचा प्रवक्त्या मुमताज जहरा बलूच म्हणाल्या की, जम्मू-काश्मीर वादावर एकतर्फी तोडगा काढता येऊ शकत नाही. ‘सुरक्षा परिषदेचा प्रस्ताव आणि काश्मीरच्या जनतेची इच्छा यानुसार यावर तोडगा काढला पाहिजे’, असे बलूच म्हणाल्या.
संपादकीय भूमिकाभारताला वारंवार धमकावणार्या पाकला समजेल अशा भाषेत भारत कधी प्रत्युत्तर देणार ? |