वादग्रस्त विधाने न थांबल्यास कार्यकर्त्यांना आवरता येणार नाही ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री
नागपूर – वादग्रस्त वक्तव्ये थांबली नाहीत, तर आमच्याही कार्यकर्त्यांना आवरायला अडचणीचे जाईल, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच चेतावणी दिली आहे. येथील रामगिरी येथे ३१ ऑगस्ट या दिवशी महायुतीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत ते बोलत होते. आरोग्य मंत्री आणि शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत अन् गणेश हाके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधात वादग्रस्त विधाने केली होती.
महायुतीच्या कोणत्याही नेत्यांनी वादग्रस्त वक्तव्य करू नयेत, यासाठी एक नियमावली ठरवली जाणार असल्याचा निर्णय बैठकीत झाला.