मुंबईतील मॉलमधील कॉफीत झुरळ सापडले !
तिघांवर गुन्हा नोंद
मुंबई – येथील इनॉर्बिट मॉलमध्ये प्रतीक रावत या तरुणाने मागवलेल्या कोल्ड कॉफीत (थंडगार कॉफी) झुरळ सापडले. या प्रकरणी त्याने तक्रार प्रविष्ट केली. यानंतर पोलिसांनी उपाहारगृह व्यवस्थापक, वेटर (वाढपी) आणि इतर संबंधित यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ‘अशा कॉफीमुळे आपल्याला अपचन, विषबाधा किंवा इतर काही त्रास झाला, तर त्याला उत्तरदायी कोण ?’ असा प्रश्न प्रदीप रावत यांनी विचारला. उपाहारगृह व्यवस्थापकांनी कॉफी बनवली जात असल्याची जागा स्वच्छ असून तेथे झुरळे येतच नसल्याचे स्पष्टीकरण दिले.
संपादकीय भूमिकाअन्न आणि औषधी प्रशासनाने अशांचे परवाने रहित करून योग्य तो दंड आकारावा ! |