पिंपरी-चिंचवडमध्ये अल्पवयीन मुलीशी चाळे करणार्याला अटक !
|
पिंपरी (पुणे) – आईच्या प्रियकराने १४ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत रक्षाबंधनाच्या दिवशी अश्लील चाळे केले. यापूर्वीही असे घडले असतांना तिने आईला सांगितले होते; परंतु आईने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे ‘आताही आई दुर्लक्ष करेल’, असे वाटून तिने हा प्रकार शिक्षिकेला सांगितला. त्याची नोंद घेत रावेत पोलिसांना शाळेमध्ये बोलवण्यात आले. पीडितेच्या सांगण्यावरून पोलिसांनी आरोपी पंकज धोत्रे याला अटक केली असून त्याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.