नवी मुंबईत रोजगाराच्या विपुल संधी ! – संदीप नाईक, जिल्हा अध्यक्ष, भाजप
नवी मुंबई – येथे रोजगाराच्या विपुल संधी असल्याचे प्रतिपादन भाजपचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष संदीप नाईक यांनी येथे केले. ‘संदीप नाईक प्रतिष्ठान’च्या वतीने आयोजित १० व्या विनामूल्य महारोजगार मेळाव्याच्या प्रसंगी ते बोलत होते. या मेळाव्याचा ४५० उमेदवारांनी लाभ घेतला असून १८० उमेदवारांची तात्काळ निवड करण्यात आली आहे.
काहींच्या मुलाखती घेऊन त्यांची नोंदणी निवड प्रक्रियेच्या पुढील टप्प्यासाठी करण्यात आली आहे. या वेळी संदीप नाईक यांच्या हस्ते निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तपत्रांचे वाटप करण्यात आले.