सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या सत्संगात आलेल्या अनुभूती !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. श्री. उत्तम वाबळे, जिल्हा अहिल्यानगर

अ. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा सत्संग लाभणार आहे’, असे कळल्यावर माझी भावजागृती झाली.

आ. मला हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या उद्गात्यांना (गुरुदेवांना) पहाण्याची उत्सुकता होती. मी सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या चेहर्‍यावरील तेज पहातच राहिलो अन् ‘ते दिव्य पुरुष आहेत’, असे मला जाणवले.

इ. ‘माझे जीवन सफल झाले’, असे मला वाटले. जीवनातील हा अनमोल ठेवा जपून ठेवून मी धर्मकार्यात भाग घेईन.’

२. सौ. दीपाली वसंत मंडलिक, ओझर, जिल्हा नाशिक.

अ. ‘सत्संगात बोलतांना माझे शरीर कंप पावत होते आणि माझी भावजागृती होत होती. मला माझा आवाज दैवी वाटत होता.

आ. जेथे गुरुदेवांचा सत्संग झाला, तेथे पुष्कळ शांत आणि थंड वाटत होते.’

३. सौ. सुरेखा विद्ये, जिल्हा अहिल्यानगर

अ. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा सत्संग आहे’, असे कळल्यावर मला पुष्कळ आनंद झाला.

आ. माझा ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’, हा नामजप आपोआप चालू झाला.

इ. आपत्काळाविषयी समजल्यावर ‘आता आपण अधिकाधिक साधना केली पाहिजे’, असे मला वाटले.

ई. गुरुमाऊलींच्या मार्गदर्शनाचे शब्द मला अमृतासमान वाटत होते. तेव्हा मला पुष्कळ चैतन्य अनुभवायला मिळाले.’

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक