…अन्यथा गोवा जुगाराच्या अड्ड्यामध्ये रूपांतरित होणार नाही ना ?
कॅसिनो आणि अमली पदार्थांच्या व्यापारात वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर गोव्याचे भविष्य
गोवा हे देशातील प्रमुख पर्यटनस्थळ आहे. गेल्या काही वर्षांत गोव्यात कॅसिनो आणि अमली पदार्थांच्या व्यापारात मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर केलेला ऊहापोह येथे देत आहे.
१. कॅसिनो व्यवसायाविषयी…
गोव्यात सध्या मांडवी नदीतील बोटींवर आणि काही हॉटेलमधील असे २० हून अधिक कॅसिनो कार्यरत आहेत. या कॅसिनोंमध्ये विविध खेळांचा समावेश असतो. या व्यवसायामुळे राज्याच्या उत्पन्नात वाढ झाली असली, तरी गुन्हेगारी आणि इतर समस्यांचीही वाढ झाली आहे.
२. अमली पदार्थांच्या व्यापारात होत असलेली वाढ
गोव्यातील अमली पदार्थांच्या व्यापारातही मोठी वाढ झाली आहे. राज्यात अमली पदार्थांच्या तस्करीच्या घटना वाढल्या आहेत. पोलिसांनी या प्रकरणात अनेक लोकांना अटक केली असली, तरी अमली पदार्थांच्या व्यापारावर नियंत्रण ठेवणे कठीण होत चालले आहे.
३. ‘महादेव ॲप’ आणि सट्टेबाजी
‘महादेव ऑनलाईन सट्टा ॲप’च्या माध्यमातून अवैध सट्टेबाजीला चालना मिळाली आहे. सट्टेबाज आणि बुकी हे मोठ्या प्रमाणात गोव्यात येत आहेत. या ॲपच्या प्रवर्तकांनी गोव्यात एक भव्य कौटुंबिक मेजवानीचे आयोजन केले होते. त्यात शेकडो सट्टेबाज आणि बुकी सहभागी झाले होते. यामुळे गोवा जुगार्यांच्या अड्ड्यात रूपांतरित होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.
४. गोव्याचे भविष्य
यामुळे ‘गोवा खरोखरच जुगार्यांचा अड्डा बनत आहे का ?’, याविषयी विचार करणे महत्त्वाचे आहे. राज्य सरकारने या अपप्रवृत्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य ती कठोर पावले उचलणे आवश्यक आहे.
– श्री. नारायण नाडकर्णी, फोंडा, गोवा.