स्वामी विवेकानंद यांचे जातीसंस्थेविषयीचे मत !
नेहमी लक्षात असू द्या की, जगातील कोणत्याही देशाहून भारतातील संस्थांची ध्येये आणि उद्दिष्टे ही अधिक उच्च आहेत. जगातील प्रायः प्रत्येक देशात मी भिन्न भिन्न प्रकारची जातीसंस्था पाहिली आहे; परंतु भारतात जातीसंस्थेची जी एक उत्कृष्ट व्यवस्था आहे आणि तिच्या मुळाशी जो एक उच्च उद्देश आहे, तसा इतरत्र कुठेही आढळत नाही. जातीविभाग जर टाळताच येत नसेल, तर ‘डॉलर’वर, धनावर, अधिष्ठित असलेल्या जातीविभागापेक्षा पावित्र्य, संस्कृती आणि त्याग यांवर आधारलेला जातीविभाग मी पसंत करीन; म्हणून निषेधाचे आणि निंदेचे शब्द उच्चारू नका. तोंड मिटवून स्वतःच्या हृदयाची कपाटे उघडा. मातृभूमीचा आणि त्यासमवेतच समस्त जगताचा उद्धार करा अन् तुमच्यापैकी प्रत्येकाला ही जाणीव असू द्या की, या महान कार्याचा संपूर्ण भार तुमच्याच शिरावर आहे.
(साभार : ‘स्वामी विवेकानंद म्हणतात’, रामकृष्ण मठ, नागपूर.)