सेवेसाठी तत्पर असणारा ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असणारा कोल्हापूर येथील कु. राज पवार (वय १७ वर्षे) !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. राज पवार हा या पिढीतील एक आहे !
(‘वर्ष २०२४ मध्ये कु. राज पवार याची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के आहे.’ – संकलक)
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
१. स्वावलंबी असणे आणि वेळेत आवरणे
‘प्रतिदिन सकाळी ९ वाजता महाविद्यालयाची बस येते. त्यामुळे तो स्वतःचे आवरणे, अंथरुणाच्या घड्या घालणे, एक खोली झाडणे इत्यादी कामे न सांगता करतो.
२. व्यायामाविषयी जागरूक असणे
तो सकाळी लवकर उठून योगासने आणि प्राणायाम करतो, तसेच सूर्यनमस्कार घालतो. यापूर्वी यासाठी त्याला सांगावे लागायचे; पण आता तो स्वतःहून व्यायाम आणि अन्य आसने करतो.
३. अल्प वेळ असूनही सेवेसाठी तत्पर असणे
राजला प्रासंगिक सेवा सांगितल्यावर तो कधीही ‘नाही’ म्हणत नाही. महाविद्यालयीन वेळेतून अल्प वेळ मिळतो; पण त्यातूनही युवा साधकांचा सेवेसाठी भ्रमणभाष आल्यावर तो सेवा करण्यासाठी तत्पर असतो.
४. महाविद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रमाच्या वेळी काळा रंग न वापरण्याविषयी पटवून सांगणे
एकदा महाविद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रम होते. त्या वेळी सर्वांनी काळा शर्ट घालण्याचे ठरवले. राजला ते मान्य नव्हते. तेव्हा त्याने काही मुलांना काळा रंग न वापरण्याविषयी सांगितले आणि ‘काळ्या रंगापेक्षा पांढरा रंग ठरवूया’, असे सांगून त्याप्रमाणे त्याने सर्वांना कृतीही करायला लावली.
५. आध्यात्मिक उपायांचे गांभीर्य असणे
एकदा माझे डोके पुष्कळ दुखत होते. तेव्हा त्याने ‘‘स्थिर राहून गुरुदेवांना प्रार्थना कर आणि नामजपाकडे लक्ष केंद्रित कर’, असे सांगितले अन् माझ्याजवळ बसून त्याने माझ्याकडून सातत्याने कापूर आणि अत्तर यांचे उपाय करून घेतले.
६. स्वभावदोष
अनावश्यक भ्रमणभाष पहाणे, नियोजनाचा अभाव, वेळ काढून स्वतःहून सेवा न करणे’
– सौ. प्रीती पवार (कु. राजची आई), कोल्हापूर. (१५.३.२०२४)
बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.