रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर साधिकेला आलेल्या अनुभूती

कु. वेदांगी दळवी

१. ‘नागपूर ते गोवा’ या रेल्वेच्या प्रवासात झालेला शारीरिक त्रास

‘आम्ही नागपूर येथून रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात जाण्यासाठी आगगाडीने प्रवास करतांना मला शारीरिक त्रास होत होता. मला मळमळत होते आणि ‘उलटी होईल’, असे वाटत होते.

२. मी आश्रमात आल्या क्षणीच माझा सर्व त्रास दूर झाला. मला एकदम चांगले वाटू लागले.

३. रामनाथी आश्रमाच्या स्वागतकक्षातील श्रीकृष्णाचे चित्र सजीव भासणे

आश्रमातील स्वागतकक्षात ठेवलेल्या श्रीकृष्णाच्या चित्राकडे पाहून ‘श्रीकृष्ण श्वास घेत आहे. तो माझ्यासमोरच उभा असून माझ्याकडे पुष्कळ प्रेमाने पहात आहे’, असे मला जाणवत होते.’

– कु. वेदांगी जयंत दळवी (वय १४ वर्षे), नागपूर (१४.५.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक