Ukrainian Drones : रशियाचा दावा : युक्रेनचे १५८ ड्रोन केले नष्ट !

मॉस्को (रशिया) – रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, त्यांच्या वायूदलाने युक्रेनचे १५८ ड्रोन नष्ट केले. त्यांपैकी २ मॉस्को शहराच्या वर आणि ९ आजूबाजूच्या भागात होते. कुर्स्क भागात ४६ ड्रोन होते. युक्रेनच्या रशियातील या ड्रोन आक्रमणांमुळे या युद्धाचे क्षेत्र आता युक्रेन न रहाता रशिया झाले आहे.