खार पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक आणि ३ हवालदार निलंबित !
बोगस आरोपी करण्यासाठी खिशात अमली पदार्थ ठेवला
मुंबई – सामाजिक माध्यमांत प्रसारित झालेल्या व्हिडिओमध्ये एका माणसाच्या खिशात अमली पदार्थ ठेवतांना चौघेजण दिसत आहेत. या चौघांमध्ये एक पोलीस उपनिरीक्षक आणि तीन हवालदार यांचा समावेश आहे. बोगस आरोपी बनवण्यासाठी त्यांनी हे कृत्य केले. या प्रकरणी खार पोलीस ठाण्यातील चौघांना निलंबित करण्यात आले आहे. संबंधित व्यक्तीच्या खिशात २० ग्रॅम मॅफेड्रोन सापडले.
संपादकीय भूमिकापोलिसांनी गुन्हे करू लागले, तर कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षण करणार कोण ? अशा घटना पोलीसदलासाठी लज्जास्पद ! |