Sardarshahar Clash : राजस्थानमधील सरदारशहर येथे हिंदूंच्या मिरवणुकीवर मशिदीजवळ आक्रमण

हिंदूंनी केले ‘शहर बंद’ आंदोलन !

हिंदूंचे आंदोलन

चुरू (राजस्थान) – सरदारशहर येथे ३० ऑगस्टला सायंकाळी हिंदूंकडून काढण्यात येणारी धार्मिक मिरवणूक येथील मशिदीजवळ पोचल्यावर डी.जे. (संगीत यंत्रणा) लावण्यावरून झालेल्या वादातून मुसलमानांकडून मिरवणुकीवर आक्रमण करण्यात आले.

रामदेवरा संघटनेकडून ही मिरवणूक काढण्यात आली होती. येथील तेलिओ मशिदीजवळ मिरवणूक पोचताच मुसलमानांनी मिरवणुकीला घेरले आणि मशिदीसमोरील डी.जे. बंद करण्यास सांगितले. या वेळी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी मुसलमानांना समजावण्याता प्रयत्न केला असता मुसलमानांनी तोडफोड आणि मारहाण करणे चालू केले.

या घटनेच्या निषेधार्थ रात्री उशिरापर्यंत सरदारशहर पोलीस ठाण्यासमोर मोठा जमाव जमला आणि त्यांनी टायर जाळून निषेध व्यक्त केला. यानंतर जिल्हाधिकारी मीनू वर्मा, पोलीस अधीक्षक अनिल कुमार माहेश्‍वरी आणि पोलीस अधिकारी अरविंद कुमार भारद्वाज यांनी हिंदु संघटना अन् शहरातील ज्येष्ठ लोक यांच्यासमवेत बैठक घेतली. या आक्रमणाच्या प्रकरणी ३ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती दिली, तसेच इतर आरोपींचाही शोध घेत असल्याचे सांगितले. यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. हिंदूंनी ३१ ऑगस्टला ‘शहर बंद’ करण्याचे आवाहन केले. या बंदला लोकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नगरपरिषदेच्या स्वच्छता कर्मचार्‍यांनी स्वच्छतेचे काम न करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी नगरपरिषदेसमोर धरणे आंदोलन केले.

संपादकीय भूमिका

राजस्थानमध्ये भाजपचे राज्य असतांना अशा घटना घडू नयेत, असेच हिंदूंना वाटते !