47 Tigers Died : यावर्षीच्या पहिल्या साडेतीन महिन्यांत ४७ वाघांचा मृत्यू
महाराष्ट्रात ११ वाघांचा मृत्यू
नवी देहली – ‘राष्ट्रीय वाघ संरक्षण प्राधिकरणा’ने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या एका अहवालानुसार देशात यावर्षी १ जानेवारी ते १२ एप्रिलपर्यंत ४७ वाघांचा मृत्यू झाला आहे. यांत १७ वाघ मध्यप्रदेशातील होते, तर ११ वाघ महाराष्ट्रातील होते. कर्नाटकात ६, उत्तरप्रदेशात ३, राजस्थान, केरळ, तेलंगाणा आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये प्रत्येकी २ , तर छत्तीसगड अन् ओडिशा राज्यांत प्रत्येकी एका वाघाचा मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षभरात वेगवेगळ्या कारणांमुळे १८१ वाघांचा मृत्यू झाला होता. गेल्या वर्षी मृत्यू झालेल्या वाघांंमध्ये सर्वाधिक वाघ महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश राज्यांतील होते. महाराष्ट्रात ४५, तर मध्यप्रदेशात ४३ वाघ मृत्यूमुखी पडले. उत्तराखंडमध्ये २१, तमिळनाडूत १५, केरळमध्ये १४, कर्नाटकात १२ आणि आसाममध्ये १० वाघांचा मृत्यू झाला.
संपादकीय भूमिकाज्या प्रकारे वाघांच्या मृत्यूचा विचार केला जातो, त्यांच्यासाठी अभयारण्य निर्माण केली जातात, तसाच प्रयत्न गोहत्या रोखण्यासाठी का केला जात नाही ? त्याकडे तितक्याच गांभीर्याने का पाहिले जात नाही ? |