Bomb Threat Shahi Eidgah Mosque : मथुरेतील श्रीकृष्णजन्मभूमीवर असणारी शाही इदगाह मशीद बाँबने उडवून देण्याची धमकी देणार्‍याला अटक

धमकी देणार्‍याची मानसिक स्थिती चांगली नसल्याची माहिती

अटक करण्यात आलेला व्यक्ती

मथुरा (उत्तरप्रदेश) – येथील श्रीकृष्णजन्मभूमीवर असलेल्या शाही इदगाह मशिदीत तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचार्‍यांना एका व्यक्तीने ‘मशीद बाँबने उडवून देऊ’ अशी धमकी दिल्याने त्याला अटक करण्यात आली. या व्यक्तीची चौकशी केली जात आहे. या व्यक्तीची मानसिक स्थिती चांगली नसल्याचे समोर आले आहे. या व्यक्तीच्या  मुलाचा मृत्यू झाल्यानंतर तो मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याचे सांगितले जात आहे.