खासगी रुग्णालयांनी समस्या न सोडवल्यास रुग्णालयांचे परवाने रहित करू !
|
सांगली, ३१ ऑगस्ट (वार्ता.) – शहरातील शासकीय रुग्णालयासमोरील गणेशनगर परिसरात मोठ्या प्रमाणात रुग्णालये, पॅथॉलॉजी लॅब वाढल्या आहेत. त्यामुळे पुष्कळ प्रमाणात वाहतूककोंडी होते. त्याचा बंदोबस्त करावा, या मागणीचे निवेदन माजी नगरसेवक मंगेश चव्हाण यांनी महापालिका प्रशासनाला ३० ऑगस्ट या दिवशी दिले. वाहतूककोंडी, अस्वच्छता यांमुळे घाणीचे साम्राज्य पसरल्याने त्याचा होणारा त्रास यांविषयीच्या तक्रारी नागरिकांनी केल्या. याची नोंद घेऊन प्रशासनाने स्थानिक रुग्णालयांना नोटिसा बजावून सर्व समस्या सोडवण्याचा आदेश दिला आहे. रुग्णालय प्रशासनाने याविषयी कार्यवाही न केल्यास त्यांचे परवाने रहित करण्याची चेतावणी महापालिका प्रशासनाने दिली आहे.
संपादकीय भूमिकानागरिकांनी तक्रारी करण्यापूर्वीच महापालिका प्रशासनाने नागरिकांच्या तक्रारी सोडवणे आवश्यक होते; मात्र याकडे दुर्लक्ष करणार्या महापालिकेच्या संबंधित अधिकार्यांवरही कारवाई झाली पाहिजे. |