श्री महालक्ष्मीदेवीच्या चरणी ५० लाख रुपयांचा सोन्याचा सिंह अर्पण !
कोल्हापूर – साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीच्या चरणी एका भाविकाने ७१ तोळे १०० ग्रॅम वजनाचा अंदाजे रक्कम ५० लाख ३३ सहस्र १६८ रुपये मूल्याचा सोन्याचा सिंह अर्पण केला. या भाविकाने त्याचे नाव घोषित करू नये, असे सांगितले असून हा सिंह देवस्थान व्यवस्थापन समितीचे प्रशासक तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी स्वीकारला.
या प्रसंगी सचिव शिवराज नाईकवाडे आणि व्यवस्थापक महादेव दिंडे उपस्थित होते.