हिंदु धर्माच्या रक्षणासाठी वज्रमूठ बांधून संघर्षासाठी सिद्ध व्हा ! – ह.भ.प. संग्रामबापू भंडारे पाटील
कोपरगाव येथे हिंदु जनआक्रोश मोर्चा आणि विठू माऊली मेळावा आयोजित
कोपरगाव (जिल्हा अहिल्यानगर), ३१ ऑगस्ट (वार्ता.) – हिंदु समाजावर आक्रमणे होत असतील, तर तरुणांनो, गुटखा खाऊन तोंड लाल करण्यापेक्षा कपाळाला टिळा लावून ते लाल करा. धर्माचा अभिमान जागा झाला पाहिजे. टोपी घातलेले, टिळा लावलेले यांना ‘जय श्रीराम’ म्हणा. व्यसनांपासून दूर रहा. व्यायाम करूया. सकस आहार घ्या. वज्रमूठ बांधा. संघर्षासाठी सिद्ध व्हा. धर्मासाठी झुंजावे, धर्माचे पालन करावे, राजकीय पक्ष जर धर्मासोबत असेल, तर राजकीय पक्षाचे पालन करावे. राजकीय पक्ष धर्माचे पालन करत नसेल, तर पक्ष सोडावा, असे प्रतिपादन ह.भ.प. संग्रामबापू भंडारे पाटील यांनी केले. ते कोपरगाव तालुक्यातील धोत्रे गावी महंत रामगिरीजी महाराज यांच्या समर्थनार्थ आणि गोरक्षक मयूर विधाते यांच्या घरावर शरियावादी जिहादशाही वृत्तीच्या नराधमांकडून करण्यात आलेल्या भ्याड आक्रमणांच्या, तसेच बांगलादेशामध्ये होणार्या हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ ‘हिंदु जनआक्रोश मोर्चा आणि विठू माऊली मेळावा’चे आयोजन करण्यात आले होते. हा मोर्चा २८ ऑगस्ट या दिवशी काढण्यात आला. या मोर्चामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
ह.भ.प. संग्रामबापू भंडारे पाटील म्हणाले, ‘‘हिंदु समाज राज्यघटनेचा आदर करणारा आहे. ही राज्यघटना केवळ हिंदूच टिकवू शकतो. ज्या-ज्या ठिकाणी मुसलमानांनी मोर्चे काढले, त्या-त्या ठिकाणच्या हिंदूंनी केवळ हिंदूंकडूनच वस्तूंची खरेदी करावी. हिंदूंनी भांडणे मिटवून एकत्र येण्याची आवश्यकता आहे.’’
हिंदु धर्मरक्षक सागर बेग म्हणाले, ‘‘केवळ मोर्चासाठी एकत्र आलो आणि विसरून जाऊ’, असे होऊ देऊ नका. अन्याय, अत्याचार यांचा प्रतिकार करा. गावात कोणताही बाहेरचा माणूस येऊ देऊ नका. न्यायालयात तक्रार गेली, तर आपण अधिवक्त्याची व्यवस्था करू.’’
या वेळी हिंदु शेरणी हर्षाताई ठाकूर, एकलव्य संघटनेचे प्रदेशाध्यक्ष योगेश सूर्यवंशी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. धोत्रे गावातील युवा प्रतिष्ठान, शिवबा प्रतिष्ठान, सोमेश्वर प्रतिष्ठान, शनैश्वर युवा प्रतिष्ठान या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमासाठी कष्ट घेतले. प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन ह.भ.प. दादा महाराज तुपसे, ह.भ.प. परशुराम अनर्थे, धोत्रे गावचे सरपंच प्रदीप चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
क्षणचित्रे१. गोरक्षक मयूर विधाते यांच्यावर १४ ऑगस्ट या दिवशी कोपरगावातील २०० ते ३०० जिहाद्यांनी जीवघेणे आक्रमण केले. त्याचा या वेळी निषेध करण्यात आला. २. मोर्चाला उपस्थित रहाण्यासाठी ‘गाव बंद’ करून बोधेगाव, तिळवणी, बोधडे, खोपडी, शिंगवी, शिंगणापूर, करंजे बुद्रूक, लौकी आदी एकूण २७ गावांतील हिंदू उपस्थित होते. गाव ‘बंद’च्या ग्रामपंचायतींच्या ठरावाची प्रत पोलिसांना देण्यात आली. (अशा कृतीशील धर्माभिमानी हिंदूंचा आदर्श सर्वच हिंदूंनी घ्यावा ! – संपादक) |