गणेशोत्सव काळात इचलकरंजी (कोल्हापूर) शहरात मांसाहार विक्री बंद करा ! – सकल हिंदु समाजाचे निवेदन
इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) – राज्यात गणेशोत्सव हा सण अतिशय आनंदात आणि मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तरी या उत्सवाचे पावित्र्य राखण्यासाठी प्रामुख्याने गणेशोत्सवकाळात श्री गणेश आगमनाचा दिवस, घरगुती श्री गणेशमूर्ती विसर्जन दिवस आणि अनंत चतुर्दशी या दिवशी शहरातील मुख्यत्वे मिरवणूक मार्ग श्री शाहू पुतळा ते पंचगंगा नदी या परिसरात पूर्णपणे मांसाहार विक्री बंद करण्यात यावी, या मागणीचे निवेदन सकल हिंदु समाजाच्या वतीने प्रांताधिकार्यांना देण्यात आले. (अशी मागणी का करावी लागते ? – संपादक) प्रांताधिकार्यांच्या वतीने हे निवेदन शिरस्तेदार संजय काटकर यांनी स्वीकारले. या प्रसंगी सर्वश्री गजानन महाजनगुरुजी, रघुनंदन महाजन, निखिल ठकार, सारंग सुतार, श्रेयस मेटे, प्रथमेश पाटील, शेखर सुकुंडे यांसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.