देवतेला विशिष्ट फुले किंवा पत्री अर्पण करण्याचे महत्त्व समजून घ्या !

देवतांना फुले आणि पत्री अर्पण करण्याचे महत्त्व अधोरेखित करणारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संशोधन !

अध्यात्मशास्त्रानुसार देवतेला विशिष्ट फुले किंवा पत्री अर्पण केली जातात, उदा. श्री गणेशाला लाल जास्वंद, श्रीकृष्णाला तुळस, तर शिवाला बेल वहातात. याचे कारण हे की, ती  फुले वा वनस्पती यांमध्ये त्या देवतेचे तत्त्व (चैतन्य) आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक असते. यासंदर्भातील एक संशोधन पुढे दिले आहे.

१. चाचणीतील नोंदी

यु.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. आशिष सावंत


या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या http://goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.

देवतेला वाहिलेली फुले अन् पत्री आणि तुलनेसाठी न वाहिलेली फुले अन् पत्री यांच्या ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ या उपकरणाद्वारे चाचण्या करण्यात आल्या. या उपकरणाद्वारे वस्तू, वास्तू आणि व्यक्ती यांच्यातील नकारात्मक अन् सकारात्मक ऊर्जा मोजता येतात. या चाचणीतील कोणत्याही घटकांमध्ये नकारात्मक ऊर्जा आढळली नाही. देवतेला न वाहिलेली फुले अन् पत्री यांच्यापेक्षा देवतेला वाहिलेली फुले अन् पत्री यांच्यामध्ये पुष्कळ अधिक प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आढळून आली. या नोंदी खाली सारणीत दिल्या आहेत.

२. निष्कर्ष

सौ. मधुरा कर्वे

न वाहिलेली फुले अन् पत्री यांपेक्षा देवतेला वाहिलेली फुले अन् पत्री यांच्यातील सकारात्मक ऊर्जा पुष्कळ अधिक असल्याचे चाचणीतून दिसून आले. याचे कारण हे की, देवतेला विशिष्ट फुले किंवा पत्री अर्पण केल्यावर (वाहिल्यावर) त्या देवतेकडून प्रक्षेपित होणारे चैतन्य त्यांच्यामध्ये (फुले अन् पत्री यांच्यामध्ये) आकृष्ट होऊन ते वातावरणात प्रक्षेपित होते.

यातून ‘हिंदु धर्मातील प्रत्येक कृतीमागे अध्यात्मशास्त्र आहे’, हे लक्षात येते. हे समजून घेऊन कृती करूया आणि चैतन्याचा लाभ करून घेऊया.’ (२७.६.२०२४)

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, संशोधन विभाग, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.

इ-मेल : mav.research2014@gmail.com