जे.एन्.पी.ए. बंदर परिसरात विविध पक्ष्यांचा संचार वाढला !
उरण – समुद्र आणि निसर्गसंपन्न विभागात असलेल्या जे.एन्.पी.ए. बंदर परिसरातील आधुनिक इको तंत्रज्ञानाचा वापर करीत येथील पाचही जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करण्यात आले आहे. यामुळे जे.एन्.पी.ए. बंदर परिसराच्या सौंदर्यात भर पडली असून परिसरात येणार्या विविध जातींच्या आकर्षक पक्ष्यांचा संचारही वाढला आहे. निसर्गाने बहरलेल्या डोंगरदर्यात आणि मोकळ्या जागी अनेक जिवंत पाण्याचे झरे, पाणवठे, तलाव अस्तित्वात आहेत. त्यामुळे लाल मुनिया, चिमणी, सुगरण, गुलाबी पिंच, कालशीर्ष भारीट, पर्वत कलर, चिरक, दयाळ, छोटा सातभाई, नर्तक, कोतवाल, सुतार, बैरागी, शेंदरी विष्फुलिफ, जेरडीनचा क्लोरॉप्सिस, पिपिट, करडा धोबी, चेस्टनट पोटाचा नटहॅच, फुलटोच्या गप्पीदास, राखी वटवट्या, शिंपी, कस्तुर, टकाचोर, राखी खाटीक, छोटा हिरवा राघू, तांबट, तांबडा होला, हरतालिका, नीलकंठ, खंड्या, भारद्वाज, सीगल आदी पक्षी येत आहेत.