Javed Akhtar On ISRO : (म्‍हणे) ‘इस्रोचे शास्‍त्रज्ञ चंद्रावर उपग्रह पाठवतात आणि मंदिरात जातात !’ – गीतकार जावेद अख्‍तर

गीतकार जावेद अख्‍तर यांचे विज्ञान आणि धर्म यांवर टीका करणारे विधान !

(डावीकडे) इस्रोचे शास्‍त्रज्ञ मंदिर दर्शन घेताना (उजवीकडे) गीतकार जावेद अख्‍तर

नवी देहली – प्रसिद्ध चित्रपट कथालेखक आणि गीतकार जावेद अख्‍तर यांनी विज्ञान आणि धर्म यांवर भाष्‍य करतांना त्‍यांना परस्‍परविरोधी ठरवले आहे. ते म्‍हणाले की, भारतात इस्रोची (भारतीय अंतराळ संशोधन संस्‍थेची) एक व्‍यक्‍ती आहे जी चंद्राच्‍या एका भागात उपग्रह पाठवू शकते. चंद्रावर चंद्रलोक आहे. तेथे देवता रहातात आणि तुम्‍ही तेथे उपग्रह पाठवता. उपग्रह तेथे पोचल्‍यावर तुम्‍ही (इस्रोचे शास्‍त्रज्ञ) मंदिरात जाता, हा स्‍किझोफ्रेनिया (एक प्रकारचा मनोविकार) आहे. मानवी इतिहासात असे पहिल्‍यांदाच घडत आहे की, तुमचे ज्ञान आणि माहिती अन् तुमच्‍या धर्माची विचारधारा एकत्र येत नाहीत, असे विधान लेखक आणि गीतकार जावेद अख्‍तर यांनी एका मुलाखतीत केले.

जावेद अख्‍तर यांनी सांगितले की, सर्व धर्म कोणत्‍याही अपवादाखेरीज अंधकार युगात आहेत. त्‍यांचीमुळे अंधकार युगाशी जोडलेली आहेत. लोकांची गर्भनाळ अंधकार युगाशी अजूनही जोडलेले आहे.

संपादकीय भूमिका

  • विज्ञानवादी असणार्‍यांनी नास्‍तिक असावे, असा नियम आहे का ? आणि आस्तिक असणारा विज्ञानवादी असू शकत नाही, असे जागतिक धोरण आहे का ?
  • जावेद अख्‍तर यांनी किती इस्‍लामी देशांनी विज्ञानात प्रगती केली आहे, वैज्ञानिक शोध लावले आहेत, याचीही माहिती द्यावी !
  • मुसलमान अद्यापही मध्‍ययुगातील काळातून बाहेर पडलेले नाहीत, हे जावेद अख्‍तर यांनाही मान्‍य असणारच; मात्र त्‍याची तुलना त्‍यांनी हिंदूंशी करू नये !