वर्षभरात मुंबईत महिलांवरील अत्‍याचार, विनयभंग आणि पॉक्‍सो अंतर्गत ४ सहस्र ३५१ गुन्‍हे नोंद !

  • देशाच्‍या आर्थिक राजधानीत मुली आणि महिला असुरक्षित !

  • विनयभंगाचे २ सहस्र २५३, तर बलात्‍काराचे ९६४ गुन्‍हे नोंद

मुंबई – येथे मुंबईत १ जुलै २०२३ ते जून २०२४ या कालावधीत विनयभंगाचे सुमारे २ सहस्र २५३ गुन्‍हे नोंद झाले आहेत. बलात्‍कारांचे ९६४ गुन्‍हे नोंद झाले आहेत. माहिती अधिकारातून ही माहिती मिळाली आहे. एका वर्षात महिलांवरील अत्‍याचार, विनयभंग आणि पॉक्‍सो नियमांतर्गत ४ सहस्र ३५१ गुन्‍हे नोंद करण्‍यात आले आहेत. त्‍यामुळे महिला आणि बालक यांच्‍या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. पॉक्‍सो कायद्यांतर्गत १ सहस्र १३४ गुन्‍हे नोंद आहेत.

मुंबईत घडत असलेल्‍या गुन्‍ह्यांमध्‍ये बहुतांश आरोपी परप्रांतीय आहेत. त्‍यामुळे पोलिसांनी मुंबईत येणार्‍या प्रत्‍येक परप्रांतियांची बायोमेट्रिक पद्धतीने नोंदणी करावी, अशी मागणी केली जात आहे.