Bangladesh Violence : बांगलादेशातील हिंसाचारात १ सहस्र लोकांचा मृत्यू, तर ४०० जण झाले आंधळे !
ढाका (बांगलादेश) – बांगलादेशात शेख हसीना यांनी त्यागपत्र देऊन देशातून पलायन केल्यानंतर झालेल्या हिंसाचारात १ सहस्र लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती बांगलादेशाच्या अंतरिम सरकारमध्ये आरोग्य खाते सांभाळणार्या नूरजहा बेगम यांनी दिली. याखेरीज या हिंसाचारामुळे ४०० जण अंध झाले आहेत.
𝗕𝗔𝗡𝗚𝗟𝗔𝗗𝗘𝗦𝗛 𝗩𝗜𝗢𝗟𝗘𝗡𝗖𝗘: 𝗔 𝗗𝗔𝗥𝗞 𝗖𝗛𝗔𝗣𝗧𝗘𝗥
Over 1,000 lives lost, 400 people blinded – the recent violence in Bangladesh marks the bloodiest period since its Independence in 1971#BangladeshCrisis#BangladeshViolence #HindusUnderAttackInBangladesh pic.twitter.com/ZJR7tMNULW
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 31, 2024
वेगवेगळ्या यंत्रणांनी मृत्यू झालेल्या लोकांच्या संख्येचे वेगवेगळे आकडे दिले आहेत. प्रत्येकाचा आकडा ६०० ते १ सहस्र यांच्यामध्ये आहे. नूरजहा म्हणाल्या की, या हिंसाचारात मोठ्या संख्येने पोलिसांनाही लक्ष्य करण्यात आले होते. सध्या अनेक पोलीस बांगलादेशातील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.
Hindus are still being targeted in #Bangladesh.
The grocery shop of a Hindu named Gautam Chakravarti was attacked, vandalized, looted in the city of Comilla recently. Items of about 1.5 lac and Rs. 50,000 were looted from the shop.
It’s a M dominated area. None of the M… pic.twitter.com/iP7LCBybMc
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 31, 2024
अवामी लीगच्या २ कार्यकर्त्यांची गोळ्या झाडून हत्या
२९ ऑगस्ट या दिवशी चितगावच्या हातझारी उपजिल्हामध्ये मसूद कैसर आणि महंमद अनीस या दोघांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हे दोघेही शेख हसीना यांच्या अवामी लीन पक्षाचे कार्यकर्ते होते.