Namaj : बरेली (उत्तरप्रदेश) येथील रस्‍त्‍यावर नमाजपठण करणार्‍या मुसलमानांना पोलिसांनी हाकलले !

बरेली (उत्तरप्रदेश) – येथे आला हजरतच्‍या उरूसामध्‍ये (मुसलमानांच्‍या धार्मिक मिरवणुकीमध्‍ये) सहभागी होण्‍यासाठी आलेले काही तरुण शुक्रवारी, ३० ऑगस्‍टच्‍या दुपारी खलील चौकात नमाजपठणासाठी रस्‍त्‍यावर बसले. त्‍या वेळी पोलिसांनी त्‍यांना  हाकलून लावले. ‘हे तरुण रस्‍त्‍यावर नमाजपठणासाठी बसल्‍याने येथे वाहतूक कोंडी झाली होती. ती दूर करण्‍यासाठी या तरुणांना तेथून हाकलून लावण्‍यात आले. शेजारीच उरूस साजरा करण्‍यात येणारे मैदान असल्‍याने तेथे नमाजपठण करण्‍यास त्‍यांना सांगण्‍यात आले’, असे पोलिसांकडून सांगण्‍यात आले. (मोकळे मैदान उपलब्‍ध असतांनाही मुसलमान रस्‍त्‍यावर नमाजपठण करतात. यावरून ते मुद्दामहून ही कृती करत असल्‍याचे दिसून येते ! – संपादक)

१. अखिल भारतीय रझा कृती समितीच्‍या युवा शाखेचे अध्‍यक्ष मौलाना अब्‍दुल्ला रझा कादरी यांनी या प्रकरणावर संताप व्‍यक्‍त केला. ‘कोतवाली पोलिसांनी असभ्‍य कृत्‍य केले, त्‍यामुळे आरोपी पोलिसांना निलंबित करण्‍यात यावे’ अशी मागणी त्‍यांनी केली. (पोलिसांनी नियमाला धरून कृती केली, तर मुसलमानांनी नियमबाह्य वर्तन केले. असे असतांना त्‍यांना पाठीशी घालणारे कादरी यांच्‍यावर प्रथम कारवाई करणे आवश्‍यक ! – संपादक)

२. तसेच उरूसाविषयीची भित्तीपत्रके येथे लावण्‍यात आली होती. ती रात्रीच्‍या वेळी फाडण्‍यात आली आहेत. संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणीही कादरी यांनी केली.

मुसलमानांच्‍या मिरवणुकीला हिंदूंचा विरोध

‘खजुरिया जुल्‍फीकार’ भागात दुपारी मशिदीत चढवलेल्‍या चादरीची मिरवणूक काढण्‍यात आल्‍याने तणाव निर्माण झाला होता. गावात रहाणार्‍या हिंदु समाजाने याला ‘नवी परंपरा’ म्‍हणत विरोध केला. इज्‍जतनगर पोलीस ठाण्‍याचे पोलीस निरीक्षक यशपाल सिंह यांनी सांगितले की, गावातून चादरीची मिरवणूक आली नाही. ती काढण्‍यासाठी काहींनी प्रयत्न केल्‍यावर त्‍याला विरोध झाला. नंतर गावाच्‍या ३०० मीटरच्‍या आत कोणतीही मिरवणुकीत येणार नाही, असे दोन्‍ही पक्षांनी मान्‍य केले.

संपादकीय भूमिका 

मुळात संपूर्ण देशातच अशा प्रकारच्‍या कृतीवर बंदी घालण्‍यासाठी आदेश दिला गेला पाहिजे. धार्मिक कृतींद्वारे वाहतुकीची कोंडी करून कुणी धर्मनिरपेक्ष देशात जनतेला त्रास देत असेल, तर त्‍यांच्‍यावर कारवाई करणे आवश्‍यक आहे !