हणजूण (गोवा) येथे कुत्र्याच्या आक्रमणात १० वर्षीय मुलाचा मृत्यू
म्हापसा – हणजूण येथे एका ‘पिटबूल’ जातीच्या कुत्र्याने २९ ऑगस्टला १० वर्षांच्या एका मुलावर आक्रमण करून त्याला घायाळ केल्यानंतर त्या मुलाचा मृत्यू झाला. यासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार या मुलाचे नाव प्रभास कळंगुटकर असून तो त्याची आई काम करत असलेल्या ठिकाणी तिच्याबरोबर होता. अचानक या कुत्र्याने त्याच्यावर आक्रमण केले आणि त्याला अनेक ठिकाणी चावे घेऊन घायाळ केले. या मुलाला उपचारासाठी त्वरित गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात नेण्यात आले; परंतु तेथे उपचारांना यश न आल्याने या मुलाचा मृत्यू झाला. पेडणे येथील पिटबुल कुत्र्याचा मालक अब्दुल कादर ख्वाजा याला अंजुना येथील त्याच्या रहात्या अटक करण्यात आली आहे. त्याने या कुत्र्याला मोकाट सोडले होते. त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
संपादकीय भूमिकासरकारकडे कोणतीही उपाययोजना नसलेली जीवघेणी भटक्या कुत्र्यांची समस्या ! |