सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना चालू केल्यावर साधिकेला ‘जे होईल, ते देवाच्या इच्छेने’, असा भाव ठेवता येणे

सौ. लक्ष्मी जाधव

‘पूर्वी मी फार हळवी आणि रडवी होते. मला लहान-सहान गोष्टींची भीती वाटत असे; मात्र मी सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना प्रारंभ केल्यावर माझ्या स्थितीत पालट झाला आहे.

माझ्या पायाचे शस्त्रकर्म झाले आहे. मी कोरोना महामारीच्या काळातही पुष्कळ रुग्णाईत होते. माझ्या मुलीचे शस्त्रकर्म झाले; मात्र या कालावधीत मला काळजी वाटली नाही. मी ‘देवाची इच्छा असेल, तसे होईल’, असा विचार करते. माझ्या जीवनात अनेक दु:खदायक प्रसंग आले; मात्र मी श्री गुरुदेवांच्या कृपेने (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने) आनंदी आहे. आता मला कसलीही काळजी नाही. ‘जे काही होईल, ते गुरुदेवांच्या इच्छेने’, असे मला वाटते. आता मी भावस्थितीत असते.

‘गुरुदेवांच्या कृपेमुळे माझ्यात हे पालट झाले आहेत’, त्याबद्दल मी गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– सौ. लक्ष्मी कोंडिबा जाधव (वय ७३ वर्षे), फोंडा, गोवा. (५.८.२०२४)