शरद पवार यांनी ‘झेड प्लस’ सुरक्षा नाकारली !
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केंद्र सरकारकडून मिळालेल्या ‘झेड प्लस’ सुरक्षेला नाकारले आहे. या संदर्भात केंद्रीय गृहखात्याला कोणत्या अशा गोष्टींमुळे शरद पवारांच्या जिवाला धोका निर्माण होईल ?, असे वाटते, त्या सर्व संभाव्य धोकादायक गोष्टींची सूची पवार यांनी गृहखात्याकडे मागितली आहे.
पवार म्हणाले, ‘‘मी स्वत: आधी मला कोणत्या प्रकाराचा धोका आहे का, ते पडताळून पाहीन. त्यानंतर ‘झेड प्लस’ सुरक्षा घ्यायची कि नाही यावर निर्णय घेईन.’’
पूर्वीही त्यांनी ही सुरक्षा नाकारली होती.