कोंढवा येथे धर्मांधाच्या अनधिकृत टेलिफोन एक्सचेंजवर धाड !
आतंकवादविरोधी पथकाची कारवाई
पुणे – शहरातील कोंढवा परिसरातील मीठानगरमधील एम्.ए. कॉम्प्लेक्समध्ये ३२ वर्षीय नौशाद सिद्दीकी हा बनावट टेलिफोन एक्स्चेंज सिम बॉक्सच्या साहाय्याने अनधिकृतपणे चालवत आहे, अशी माहिती मिळाली. घटनास्थळावर धाड घातल्यानंतर विविध आस्थापनांचे ७ सीम बॉक्स, ३ सहस्र ७८८ सीम कार्ड, ९ वायफाय राऊटर, भ्रमणभाष, अँटिना आणि भ्रमणसंगणक हे साहित्य जप्त करण्यात आले. नौशादवर विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई आतंकवादविरोधी पथकाने (‘ए.टी.एस्.’ने) केली आहे. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात घातपाती कारवायांच्या संभाव्य घटनांच्या अनुषंगाने पोलीस आणि अन्वेषण यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
नौशादने सीमकार्ड कुठून आणले ? त्याला कोणत्या वितरकाने हे सीमकार्ड पुरवले ? त्याने ही यंत्रणा कशी उभारली ? त्याचे प्रशिक्षण कुठे घेतले ? त्याला या कामासाठी कुणी कुणी आर्थिक साहाय्य केले ? कोंढवा येथे जागा कुणी आणि कशी दिली ? या सूत्रांची अन्वेषणामध्ये कसून चौकशी करण्यात येत आहे.
विदेशातून भारतात येणारे इंटरनॅशनल कॉल (आंतरराष्ट्रीय संदेश) भारतातील यंत्रणेला समजू न देण्यासाठी या एक्सचेंजचा उपयोग केला जात होता. त्याकरता या सीमकार्डांचा उपयोग केला जात होता.
संपादकीय भूमिका
|