रामभक्ती म्हणजे काय ?
रामावर विश्वास ठेवायचा, ते एकदा ठरवा. एकदा ते ठरले की, मागे वळून पहायचे नाही कधी ! त्यानंतर फक्त विश्वास, विश्वास आणि विश्वास करतच जगायचे. अहो, श्वासतर सगळेच जण घेतात. ‘वि’शेषत्वाने ‘श्वास’ घ्यायचा, म्हणजे विश्वास. ‘मी प्रत्येक श्वास या रामभक्तीत जगेन, माझे प्रत्येक स्पंदन या दिव्यत्वाच्या एकतेशी असेल, याचेच नाव रामभक्ती !’
– ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज